गांजा वाहतूक प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

खेड:- मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी घाटानजीक गांजा वाहतूक प्रकरणी पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गजाआड केलेल्या लक्ष्मण कुंदन भोरे याच्यासह ३५ वर्षीय महिलेस न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

सातारा येथून ३ किलो ७५८ ग्रॅम गांजा घेऊन दोघेजण दुचाकीने खेडच्या दिशेने जात असताना येथील पोलिसांनी सापळा रचत दोघांनाही जेरबंद केले होते. त्यांच्याकडून ५६ हजार २५६ रुपये किमतीचा गांजा जप्त केला होता. दोघांनाही २६ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. ही मुदत संपल्याने पुन्हा आले न्यायालयासमोर हजर करण्यात होते.