रत्नागिरी:- देवळे (ता. संगमेश्वर) येथे कंपनीच्या टॉवर साठी ठेवलेले ९२ हजार ५०५ रुपयांचे लोखंडी साहित्य चोरट्याने पळविले. देवरुख पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ९ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने देवळे येथे कंपनीच्या टॉवर बांधण्यासाठी ठेवलेले साहित्य लोखंडी ॲंगल, लोखंडी पाईप, ब्रेसींग बोल्ट सेट, नटबोल्ट असे ९२ हजार ५०५ रुपये किमतीचे सामान अज्ञात चोरट्याने पळविले. या प्रकरणी सुशील चिंतामण पासलकर यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास देवरुख पोलिस अमंलदार करत आहेत.