रत्नागिरी:- शहरातील बेलबाग- धनजीनाका येथे विनापरवाना गावठी हातभट्टीची दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. कारवाईत ५५० रुपयांची १० लिटर दारु पोलिसांनी जप्त केली. शहर पोलिस ठाण्यात संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (ता. २१) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास धनजीनाका येथे निदर्शनास आली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार बेलबाग-धनजीनाका येथे संशयित महिला विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी कारवाई करुन ५५० रुपयांची १० लिटर दारु जप्त केली. या प्रकरणी रिशीता गावकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.









