रत्नागिरी:- दुचाकी विकण्याची जाहिरात ओएलएक्सवर टाकल्यानंतर अज्ञात संशयितांने बनावट सोन्याची नाणी खरी असल्याची सांगून फिर्यादी तरुणाची 6 लाख रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनकर (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) असा संशयित आहे. ही घटना 9 ते 21 सप्टेंबरला रत्नागिरी रेल्वेस्टेशन माऊली शेगाव येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सरदार राजाराम गोसावी (वय 28, रा. आठवडा बाजार, रत्नागिरी, मुळ ः तांदुळवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी त्यांच्या मालकीची दुचाकी (क्र. एमएच-04 केके 8451) ही विक्री करण्याबाबत ओएलएक्स वर जाहिरात टाकली होती. त्यावेळी संशयित दिनकर याने गाडी खरेदीच्या बहाण्याने त्यांच्याकडील सोन्याची क्वाईन (नाणी) खरी असल्याचे खोटे सांगून फिर्यादींची दिशाभूल केली. व्यवहारापोटी फिर्यादी गोसावी यांच्याकडून 6 लाख रुपये स्विकारुन उद्देशपुर्वक फसवणूक केली. या प्रकरणी गोसावी यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित दिनकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.