वेश्या व्यवसाय प्रकरणातील सहा संशयितांना सशर्त जामीन

रत्नागिरी:- शहरातील सिद्धीविनायक नगर येथे वेश्याव्यवसाय चालविल्याचा आरोप असलेल्या 6 संशयितांची न्यायालयाने 25 हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर मुक्तता केल़ी जामीन मंजूर करताना न्यायालयाने संशयितांनी दोषारोपपत्र दाखल होईपर्यंत दर रविवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावायची असून पोलिसांना तपासात सहकार्य करावयाचे आह़े, असा आदेश न्यायालाने दिला आह़े.

समीर मंगेश लिंबुकर (23, ऱा साडवली देवरूख), श्रीमंत चंद्रम पूजारी (55, ऱा फणसोप सडा मुळ ऱा कर्नाटक), स्वप्नील बाळकृष्ण इंदुलकर (40, ऱा रेल्वेस्टेशन रत्नागिरी), रोहन मंगेश कोळेकर (30, ऱा सिद्धीविनायक नगर रत्नागिरी), अरबाज अस्लम चाऊस (25, ऱा साखरतर रहमत मोहल्ला, रत्नागिरी) व साई पसाद साळुंखे (21, ऱा कोकणनगर रत्नागिरी) अशी जामीनावर मुक्तता झालेल्या संशयितांची नावे आहेत़ रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिल अंबाळकर यांनी जामीन अर्जावर निकाल दिल़ा
शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुह्यानुसार शहरातील मध्यवर्ती आणि उच्चभ्रू ठिकाणी- सिध्दिविनायक नगर येथील एका फॅल्टमध्ये दोन तरुणींचा वापर करुन वेश्याव्यवसाय चालवत असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होत़ी त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने 20 जुलै रोजी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास छाटा टाकला होत़ा यावेळी संशयित आरोपी राजेंद्र चव्हाण हा वेश्याव्यवसाय चालवित असल्याचे पोलिसांना आढळून आल़े त्यानुसार मुख्य संशयित आरोपी राजेंद्र याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होत़ी.

पोलिसांकडून राजेंद्र याची कसून चौकशी करण्यात आल़ी तसेच राजेंद्र याचा मोबाईल क्रमांकाच्या सीडीआर तपासण्यात आल़े यावेळी राजेंद्र हा सातत्याने काही लोकांच्या संपर्कात असल्याचे दिसून आल़े त्यानुसार पोलिसांनी याबाबत पुढील तपास केला असता संशयित आरोपी यांच्या मदतीने राजेंद्र हा वेश्याव्यवसाय चालवित असल्याचे उघड झाल़े त्यानुसार पोलिसांकडून संशयितांविरूद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केल़ी.

पोलिसांकडून अटक झाल्यानंतर सर्व संशयित आरोपी हे न्यायालयीन कोठडीत होत़े त्यांच्याकडून सत्र न्यायालयापुढे जामीनासाठी अर्ज करण्यात आला होत़ा आपण निर्दोष असून केवळ कॉल रेकॉर्डच्या आधारे आपल्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होत़ी तसेच तपासाचे काम पूर्ण झाले असून आपल्याला जामीन मिळावा यासाठी संशयितांकडून न्यायालयापुढे जामीनासाठी अज्र दाखल करण्यात आला होत़ा.