रत्नागिरी:- शहरातील शिवाजीनगर येथील वेश्या व्यवसाय प्रकरणातील संशयितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.मंगळवारीही शहर पोलिसांनी या गुन्ह्यातील अन्य दोघांना अटक केली.
श्रीमंत चंद्राम पुजारी (55,मुळ रा.विजापूर,कर्नाटक सध्या रा.फणसोप सडा आणि स्वप्निल बाळकृष्ण इंदुलकर (40,रा.शाखंबरी अपार्टमेंट,रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या अन्य दोघांची नावे आहेत.या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांची रवानगी 2 दिवसांच्या पोलिस कोठडीत केली.या गुन्ह्यातील संशयितांची संख्या आता 12 झाली असून यातील 8 जण न्यायालयीन तर उर्वरित 4 जण पोलिस कोठडीत आहेत.