रत्नागिरी:- रंग माझा वेगळा, नवा गडी नवं राज्य या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारणार्या मराठी बालकलाकाराच्या आईला फसवणूक प्रकरणात अटक करण्यात आली होती. पूजा भोईर असे या महिलेचे नाव आहे. रत्नागिरीतील महिलेची ११ लाख रूपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा पूजा हिच्याविरूद्ध दाखल करण्यात आला होता दरम्यान पूजा हिच्याविरूद्ध फसवणुकीचे राज्यभरातील पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. नुकतेच तिला नाशिक व मुंबई पोलिसांकडून अशाच एका फसवणूकीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
मुंबईतूनच पूजा भाईर हिला रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. मंगळवारी तिला न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता २५ हजार रूपयांच्या जामिनावर तिची मुक्तता करण्यात आ]ली. भोईर हिच्यावतीने ॲड. मनिष नलावडे व ॲड. तनया सावंत यांनी युक्तिवाद केला
पूजाने अल्गो ट्रेडिंग नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीत गुंतवणूक करून आर्थिक लाभाचे आमिष पूजा ही दाखवत होती. यासाठी लोकांकडून तिने मोठ्या प्रमाणावर पैसे स्वीकारले होते. मात्र कालांतरने पैसे स्वीकारून पूजा ही फसवणूक करत असल्याची माहिती समोर आली. ११ लाख रुपये स्वीकारले होते. मात्र ही रक्कम पूजाने महिलेला परत केली नव्हती, दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच या महिलेने पूजा हिच्याविरूद्ध रत्नागिरी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या पूजा हिचा रत्नागिरी पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. याचदरम्यान पूजा हिच्याविरूद्ध राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. तसेच पूजा हिला नाशिक व मुंबई पोलिसांकडून देखील अटक केल्याची माहिती रत्नागिरी पोलिसांना मिळाली. फसवणुकीच्या गुन्हा दाखल असल्याने रत्नागिरी पोलिसांकडून पूजा हिला मुंबई येथून अटक करण्यात आली.