राजापूर:- तालुक्यातील श्री महाकाली इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नवेदर आडिवरे हायस्कूलचे कार्यालय फोडून अज्ञाताने २० हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना गुरुवार, १३ जुलै रोजी सायंकाळी ५ ते शुक्रवार, १४ जुलै रोजी सकाळी ८ वा. कालावधीत घडली आहे.
या प्रकरणी नाटे पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञाताने या हायस्कूलच्या कार्यालयातील लाकडी खिडकीचे गज कापून त्याव्दारे आतमध्ये प्रवेश करुन एपसन कंपनीचा एम २०५ प्रिंटर मल्टीफंक्शन वायफाय आणि हॉटस्पॉट राउटर असा एकूण २० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.