लग्नाचे आमिष दाखवून संबंध; तिघांना कोठडी

रत्नागिरी:- अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित तिघांना करणाऱ्या न्यायालयाने शुक्रवारी न्यायालयीन कोठडी सुनावली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १९ फेब्रुवारी ते ६ मार्च २०२३ या कालावधीत खंडाळा (जयगड ) व दिवा मुंबई , साठरेबांबर येथे घडली होती . यज्ञेश अनंत धनावडे , प्रतीक संतोष ताम्हणकर , रुतिकेश रवींद्र शिंदे अशी न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत . संशयितांनी पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले . त्यातून ती गरोदर राहिली . या प्रकरणी पीडितेने जयगड पोलिसात तक्रार दिली . तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरुद्ध भारतीय दंडविधान कलम ३७६ ( २ ) ( जे ) ३७६ ( २ ) ( एन ) लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४,६ ९ ( एल ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे . संशयितांना न्यायालयाने यापूर्वी तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती . शुक्रवारी पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात पुन्हा हजर करण्यात आले . न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे . अधिक तपास पोलिस करत आहेत.