अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी साखरतर येथील तरूणावर गुन्हा

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरानजीकच्या साखरतर येथे अंमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आल़ा आहे. शनिवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास शहर पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आल़ी. उजेफा अब्दुल हमिद साखरकर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरानजीकच्या साखरतर येथे अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होत़ी. त्यानुसार शहर पोलिसांकडून 3 जून रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास छापा टाकल़ा. यावेळी संशयित आरोपी उजेफा याच्या ताब्यात 2.68 ग्रॅम वजनाचा टर्की हा अंमली पदार्थ आढळून आल़ा अशी माहिती शहर पोलिसांकडून देण्यात आली. याप्रकरणी आरोपी याच्याविरूद्ध एनडीपीएस ऍक्ट 1985 चे कलम 8 (क),22(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आल़ा. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े.