रत्नागिरी:- तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे घराच्या पुढील दरवाज्याचे कडी कोयंडा चोरट्याने धारदार हत्याराने उचकटून चोरट्याने घरातील ८२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. जयगड पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार ९ ते १० मे या कालावधीत घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती, चोरट्याने फिर्यादी यांच्या घराचा पुढील दरवाजाची कडी कोयंडा कुलपासह कोणत्यातरी हत्याराने तोडून घरात प्रवेश केला. बेडरुमधील लोखंडी कपाटाचा दरवाजा व लॉकर उचकटून कपाटातील लॉकरमध्ये स्टीलच्या डब्यात ठेवलेले ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व २ हजार ७०० रुपयांची रोकड असा ८२ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात फिर्यादींनी तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.