पावस येथे अवैधरित्या दारू बाळगणाऱ्यावर गुन्हा

रत्नागिरी:- रत्नागिरी-पावस मार्गावरील गोठणेवाडी फाटा येथे अवैधरित्या दारू बाळगणाऱ्यावर पूर्णगड पोलिसांनी गुन्हा दाखल केल़ा. ही कारवाई गुरूवारी सायंकाळी 6 च्या सुमारास करण्यात आल़ी. रघुवीर विश्वनाथ पेटकर (47, ऱा रनपार तोडणकर वठार ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी पावस मार्गावरील गोठणेवाडी फाटा येथे अवैधरित्या दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होत़ी त्यानुसार 23 मार्च 2023 रोजी पुर्णगड पोलिसांनी गोठणेवाडी फाटा येथे छापा टाकल़ा. यावेळी रघुवीर पेटकर याच्या ताब्यात अवैध दारू आढळून आल़ी यामध्ये देशी संत्रा जीएम च्या 180 मिली च्या 9 बाटल्या, देशी दारूच्या 12 बाटल्या आढळून आल्य़ा यापकरणी पोलिसांनी रघुवीर याच्याविरूद्ध महाराष्ट्र दारू बंदी कायदा कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.