खेड सुकीवली येथे गांजा विकणाऱ्या दोघांसह ९० हजाराचा मुद्देमाल जप्त

खेड:- तालुक्यातील सुकीवली येथील स्मशानभूमीनजीक गांजाची विक्री करणाऱ्या दोघांना येथील पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून सुमारे ८९ हजार ८३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. 

या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आकाश विजय जाधव (वय ३२), गौतम शांताराम जाधव (२५, दोन्ही रा. बौद्धवाडी, सुकिवली, खेड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. १५ हजार रुपयांचा गांजा एका पिवळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीमध्ये असलेला हिरवट पाने, फुले, काड्या व बिया असलेला उग्र दर्प/वास असलेला एकूण १ किलो ४४ ग्रॅम वजनाचा सुकलेला गांजा, दुचाकी, मोबाईल, इलेक्ट्रीक वजन काटा व एक सॅकबॅग असा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.