रत्नागिरी:- तालुक्यातील नाणीज तळवाडी आणि करबुडे या दोन वेगवेगळ्या ठिकाणी जंगलमय भागात बेकायदेशिरपणे गावठी दारु बाळगल्याप्रकरणी दोघांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार 28 जानेवारी रोजी दुपारी 1.30 आणि सायंकाळी 6 वा.करण्यात आली.
सचिन शांताराम भायजे (रा.चोरवणे संगमेश्वर,रत्नागिरी) आणि संजय लक्ष्मण सोनवडकर (40,रा.करबुडे,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे
आहेत.त्यांच्याविरोधात सहाय्यक पोलिस फौजदार संतोष कांबळे आणि पोलिस हेड काँस्टेबल किशोर जोशी यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,शनिवारी नाणीज आणि करबुडे येथे बेकायदेशिरपणे गावठी हातभट्टीच्या दारुची विक्री होत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती.पोलिसांनी नाणीज येथे 500 रुपयांची 9 लिटर दारु आणि करबुडे येथे धाड टाकून 270 रुपयांची 5 लिटर दारु जप्त केली. संशयितांविरोधात महाराष्ट्र दारु अधिनियम कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.