पोटच्या मुलीकडून माहेरी चोरी; पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

संगमेश्वर:- लग्न झालेल्या मुलीने स्वतः च्या माहेरी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. संगमेश्वर तालुक्यात हा धक्कादायक प्रकार घडला असून या प्रकरणी संशयित मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मुलीने आई वडिलांच्या घरी दागिन्यांची व रोख रक्कमेची चोरी केल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील पुर्ये तर्फे देवळे बौध्दवाडी येथे घडली. याप्रकरणी मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद गौतम भिकाजी पवार (50, व्यवसाय शेती, पुर्ये तर्फे देवळे, बौध्दवाडी, संगमेश्वर) यांनी देवरुख पोलीस ठाण्यात दिली. ही घटना 19 डिसेंबर 2022 च्या मध्यरात्री घडली. मात्र या घटनेची तक्रार 13 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास दाखल करण्यात आली. पोलिसांनी मुलीवर भादविकलम 380 नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.