रत्नागिरी:- कोकणात त्यातही विशेष करून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सात बाराच्या इतर अधिकारात कुळांची नोंदी आहेत, सदर कुळ मालक म्हणून कब्जेदार सदरी येण्यापूर्वी मयत झाल्यास त्या कुळाचा वारस तपास करण्याची ऑनलाईन सुविधा तलाठी याना उपलब्ध नव्हती, याबाबत काही तक्रारी सुध्दा येत होत्या.ऑनालाईन सुविधा नसल्याने तलाठी याना सुध्दा याबाबत कार्यवाही करता येत नव्हते.
बर्याच कालावधीपासून प्रलंबित असलेला कुळाच्या वारस तपासाची ही सुविधा जमाबंदी आयुक्त कार्यालयाने आता तलाठी लॉग इन ला उपलब्ध करून दिलेली आहे. रत्नागिरी तालुक्यातील सर्व शेतकरी यांना असे कुळाचे वारस तपास करायचे असल्यास त्यांनी सबंधित तलाठी यांचेकडे वारस नोंद करणेबाबत अर्ज व आवश्यक ते कागदपत्रे द्यावेत व कुळाचा वारस तपास करवून घ्यावे असे रत्नागिरी तहसीलदार जाधव यांनी आवाहन केलेआहे.