जिल्ह्यातील सव्वादोन लाख ग्राहकांना फटका
रत्नागिरी:- भारतीय टपाल खात्याचे देशभरातील सर्व्हर डाऊन झाल्याने गेले दोन दिवस व्यवहार पुर्णत: ठप्प झाले आहेत. याचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील 2 लाख 28 हजार 548 खातेदारांना बसला आहे. सर्व्हर डाऊन झाल्यामुळे ग्राहकांना कोणतेच व्यवहार करता येत नसल्यामुळे त्याची आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. याचा सर्वाधिक फटका वयोवृद्ध ग्राहकांना बसला आहे. सर्व्हर केव्हा पुर्ववत होणार हे याचे स्पष्टीकरण अद्याप टपाल खात्याकडून देण्यात आलेले नाही.
सर्व्हर डाऊन झाल्याने जिल्ह्यातील सर्व प्रमुख टपाल कार्यालयांतील कामकाज सुमारे सोमवारपासून ठप्प झाले. त्यामुणे, नागरिकांची मोठी गैरसोय झाली. कार्यालयांमधून बचत खात्यामध्ये पैसे भरणेकाढणे, सेवानिवफत्ती वेतन अदा करणे, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, आरडी, एमआयएस, पीपीएफ आदी कामे केली जातात. यापैकी, बहुतेक कामे आनलाईन स्वरुपाची आहेत. रजिस्टर किंवा पार्सलची कामे केवण आफलाईन केली जातात. मागील काही महिन्यांपासून टपाल खात्याला सर्व्हर डाऊन असल्याची समस्या वारंवार भेडसावत आहे. अधूनमधून सर्व्हरची गती मंदाविण्याचेही प्रकार घडतात. त्यामुळे, नागरिकांना नाहक रांगेत उभे रहावे लागते.
सोमवारी सकाळी आठवड्याच्या पहिल्या दिवशी कामकाजाला सुरुवात केल्यानंतर
सर्व्हर डाऊन असल्याचे कर्मचार्यांच्या लक्षात आले. त्यांनी याची तक्रार राज्यस्तरावर केल्यानंतर टपाल विभागाचे देशातीलच सर्व्हर डाऊन असल्याचे पुढे आले.
सोमवारी सायंकाळी सर्व्हर पुर्ववत होईल अशी शक्यता असताना सलग दुसर्या दिवशीही सर्व्हर डाऊनच राहिल्याने सर्व व्यवहार ठप्प झाले.
रत्नागिरी जिल्ह्यात 2 मुख्य टपाल कार्यालयासह 77 उपडाकघर, व 584 शाखा कार्यालयाच्या माध्यमातून 8 लाख 61 हजार 598 खातेदार आहेत.तर 2 लाख 28 हजार 548 राष्ट्रीय बचत प्रमाणपत्राची खाती आहेत. सर्व्हर डाऊन झाल्यानंतर टपाल कार्यालयात आर्थिक व्यवहार करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना रिकाम्या हाती परतावे लागेले.
टपाल खात्याच्या सर्व्हरचे तांत्रिक दुरुस्तीचे काम सुरु असल्यामुळे सर्व्हर डाऊन झाल्याचे वरिष्ठ अधिकार्यांमार्फत सांगण्यात आले आहे. मात्र सर्व्हर का डाऊन आहे. याचे अधिकृत स्पष्टीकरण टपाल खात्याने दोन दिवसांनंतरही दिलेले नाही.आम्ही गरिब माणसं, मजूरी करुन मिळणारे पैसे पोस्टात ठेवतो. आज आम्हची गरज आहे. तेव्हा आमचे पैसे मिळत नसतील तर आम्ही कराचे काय? जेव्हा तेव्हा कारण सांगतात.आज काय सर्व्हर डाऊन उद्या का दुसरेच कारण, एखाद्याकडे तेवढेच पैसे असतील तर त्याने उपाशी राहयचे का? असा थेट सवाल शेतकरी सौ.अनिता कळंबटे यांनी उपस्थित केला आहे. पोस्टात जाऊन पैसे न मिळाल्याने त्यांनी आपली तिव्र प्रतिक्रिया व्यक्त केली.









