रत्नागिरी:- शहरातील काँग्रेसभुवन रोडवरील प्रमोद महाजन क्रीडा संकुलासमोरील फुटपाथवर दारु पिऊन मद्यधुंद अवस्थेत सापडलेल्या 5 जणांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुशांत सुनील जोशी (36, झाडगाव, मुरुगवाडा, रत्नागिरी), बीपीन ईश्वरलाल टुकडीया (40, भडंग तिठा, मांडवी), आदित्य मिलींद भाटकर (26, भाट्ये, महाजनवाडी), इशांत दीपक नागवेकर (38, मुरुगवाडा, कावळेवाडी, रत्नागिरी), जुबेर निसार निशानदार (39, पठाणवाडी, भगवतीबंदर, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या 5 जणांची नावे आहेत.









