रत्नागिरी:- वर्चस्व कोणाचे… गड अबाधित राहणार
की गडाला सुरूंग लागणार… याचा निकाल उद्या मंगळवारी लागणार असून रत्नागिरी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी
होणार आहे. मालगुंड, चाफेरी, कासारवेली, वळके, धामणसे आदी ग्रामपंचायतींच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
रत्नागिरी तालुक्यात २५ ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान झाले. मतदानासाठी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तालुक्यात ६४.३४ टक्के मतदान
झाले. मतदानासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने गावात दाखल झाल्याने याचा फायदा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाला की बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळणार याचे आराखडे बांधले जात आहेत. रत्नागिरी तालुक्यामध्ये २९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. यातील चार गावांमध्ये सरपंचपदासह सदस्यही बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले तर एकूण सहा सरपंच बिनविरोध निवडून आले. त्यामुळे २५ ग्रामपंचायतीमध्ये निवडणुका लागल्या होत्या. सर्वच ठिकाणी मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर पहिल्यांदा मोठ्या प्रमाणात ग्रामपंचायत निवडणूका होत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. मात्र ही निवडणूक ठाकरे विरूद्ध शिंदे अशीच झाली. या ग्रा. पं. कडे लक्ष
तालुक्यातील मालगुंड, भगवतीनगर, पूर्णगड, वळके, साठरे यासह धामणसे या ग्रामपंचायत निवडणुकीत मोठी चुरूस झाली. या ग्रामपंचायती ताब्यात
ठेवण्यासाठी दोन्ही बाजूने जोरदार प्रयत्न झाले आहेत. त्यामुळे उद्या मंगळवारी निवडणुकीच्या निकालात मतदार कौल कोणाला देणार? याकडेच साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या गटात मोठी चुरस रंगली. तालुक्यात उद्धव ठाकरे गटाकडून तालुकाप्रमुख प्रदीप उर्फ बंड्याशेठ साळवी तर शिंदे गटाकडून महेश उर्फ बाबू म्हाप या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गड राखण्याचा प्रयत्न
२५ ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचा गड अबाधित रहावा यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे गटाकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले आहेत. कोणत्याही परिस्थितीत रत्नागिरीचा गड ढासळू द्यायचा नाही असा चंगच ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी बांधला आहे.
एकीकडे ठाकरे गटातील शिवसैनिक पेटून उठून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले असताना दुसरीकडे शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी ठाकरेंच्या गडाला सुरूंग
लावण्यासाठी व्यूहरचना आणखली होती. त्यामुळे उद्याच्या निकालात गडाला सुरूंग लागणार का? याकडेच साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
सभा फलदायी ठरणार? नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा रत्नागिरीत पार पडली.
रेकॉर्ड ब्रेक गर्दी या सभेला उसळली होती. सभेनंतर दोन दिवसांनी निवडणूक प्रक्रिया झाली. मुख्यमंत्र्यांची सभा रत्नागिरी मतदारसंघात किती फलदायी ठरली? हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये कासारवेली, केळ्ये, गणेशगुळे, गावडे आंबेरे, चांदोर, चाफेरी, जांभारी, टिके, टेंभ्ये, तरवळ, तोणदे, धामणसे,
निवळी, निवेंडी, पिरंदवणे, पूर्णगड, फणसवळे, भगवतीनंगर, मालगुंड, मावळंदे, वळके, विल्ये, वेतोशी, सत्कोंडी, साठरे या ग्रामंचायतींचा निकाल
आज जाहीर होणार आहे.









