Saturday, May 9, 2026
spot_img
Home राजकीय चिपळूणमधील राजकारण रत्नागिरीत देखील करण्याचा प्रयत्न झाला

चिपळूणमधील राजकारण रत्नागिरीत देखील करण्याचा प्रयत्न झाला

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून थेट आरोप

रत्नागिरी:- चिपळूणमधील राजकीय विस्कटलेल्या स्थितीचा दाखला देत, तेच राजकारण रत्नागिरीतही करण्याचा प्रयत्न झाला आणि आम्हाला गडवलं!” अशा थेट आणि गंभीर आरोपांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत आक्रमक भूमिका घेतली आहे. युती-आघाडीत झालेला कथित विश्वासघात आणि ‘उबाठा’ (शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून करण्यात आलेल्या उपेक्षेमुळे राष्ट्रवादीने आता ‘एकला चलो रे’ चा स्पष्ट इशारा दिला आहे.

सरचिटणीस बाप्पा सावंत, ॲड. राजेश आंब्रे, राजन, अस्मिता आणि शहराध्यक्ष बशीर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विकासकामांचा पाढा वाचत, विरोधकांच्या अपप्रचाराला सडेतोड उत्तर दिले.

‘विकास’ आणि ‘निधी’वर ठाम भूमिका
शहरात “केवळ पडण्यासाठी उभे आहोत” अशा ज्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्या निराधार आहेत, असे राष्ट्रवादीने स्पष्ट केले. रत्नागिरी शहराचा पायाभूत सुविधांचा विकास तटकरे साहेबांमुळेच झाला आहे,” यावर जोर देण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर परिषदेसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला असून, विकासाच्या याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवत आहे.

गेल्या ८ वर्षांत रत्नागिरी शहराची पुरती वाट लावली आहे. शहरात कोणत्याच सुविधा नाहीत, असा थेट आरोप विरोधकांवर करण्यात आला. “आम्ही खासदारकीला, आमदारकीला खांद्याला खांदा लावून काम केले, पण आता केवळ पडण्यासाठी उभे राहिलोत, असा अपप्रचार सुरू आहे. राष्ट्रवादी विकासाच्या दृष्टीने सामोरे जात आहे, आम्हाला कुणी उभे केलेले नाही. असे बंटी वनाजू यांनी म्हटले.

शहरात हिंदू-मुस्लिम असा भेद केला जात असल्याच्या कथित प्रयत्नांवरही नेत्यांनी टीका केली. “रत्नागिरीत हिंदू-मुस्लिम असा भेद केला जात आहे, मात्र राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदासाठी पहिला मुस्लिम उमेदवार दिला आहे,” याकडे त्यांनी लक्ष वेधले.
‘उबाठा’ गटावर फसवणुकीचा गंभीर आरोप
युती/आघाडी करण्याबाबत झालेल्या चर्चा आणि मागण्यांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ‘उबाठा’ गटावर फसवणुकीचा गंभीर आरोप केला.

बशीर यांनी स्पष्ट केले की, युती म्हणून किंवा दुसऱ्या बाजूने आघाडी लढवण्याची तयारी होती, परंतु राष्ट्रवादीने नगराध्यक्षपदाचा उमेदवार देण्याची मागणी केली. ‘उबाठा’ गटाने वेळकाढूपणा केला आणि राष्ट्रवादीला फसवलं. “शहर प्रमुख मेनेज झाले, मीटिंग घ्यायला पण त्यांनी उशीर केला, आणि आमच्या पक्षाने कोकणमध्ये उबाठा गटाला सोडले.”
“राष्ट्रवादीने विकास केलीय. यापुढे असाच वागला गेलात, तर रत्नागिरीत आम्ही ‘एकला चलो रे’ अशीच भूमिका घेणार,” असा स्पष्ट इशाराही यावेळी देण्यात आला.