रत्नागिरी:- मुुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील ईश्वर धाब्यासमोर बेदरकारपणे चारचाकि वाहन चालवून समोरुन येणार्या दोन दुचाकिंना धडक देत अपघात केला. अपघाताची ही घटना शुक्रवार 21 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री 3.15 वा.घडली.याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अक्षय सुनिल तट्ट (30, रा.फिनोलेक्स कॉलनी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित कार चालकाचे नाव आहे.त्याच्याविरोधात अशांकेत राजेश डोर्लेकर (21, रा.कोंडकारुळ दिवाणतवाडी,रत्नागिरी) याने तक्रार दिली आहे. त्यानूसार,गुरुवारी मध्यरात्री अशांकेत आपल्या ताब्यातील दुचाकि (एमएच- 08-वाय- 0696) वरुन कौस्तुभ विश्वनाथ पालशेतकर (21, रा.वरवडे, रत्नागिरी) याला सोबत घेउन तसेच त्यांचाच मित्र साईराज विकास दाभोळकर (21, रा.पालशेत गुहागर) हा आपल्या ताब्यातील दुचाकि (एमएच- 08-एडी- 2087) वरुन विघ्नेश सुधाकर डोर्लेकर (21, रा.वरवडे, रत्नागिरी) याला सोबत घेउन असे हे चारही मित्र दोन दुचाकिंवरुन हातखंबा ते निवळ असे जात होते.त्याच सुमारास अक्षय तट्ट हा आपल्या ताब्यातील कार (एमएच- 12-एचझेड- 8541) घेउन निवळी ते हातखंबा असा येत होता. ही तीन्ही वाहने ईश्वर धाब्यासमोरआली असता अक्षयचा कारवरील ताबा सूटला आणि त्याने समोरुन येणार्या या दोन्ही दुचाकिंना धडक देत अपघात केला.यात दुचाकिवरील चारही जण जखमी झाले असून अक्षयने अपघात होताच पळ काढला.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार वाजे करत आहेत.









