रत्नागिरी:- शहरात एकामागोमाग एक गुन्हेगारी घटना घडत आहेत. भूल टाकून लुट करणे, हत्या करणे अशा घटना वाढत असतानाच काल रात्री चोरट्यांनी रत्नागिरी बाजारपेठेतील चार दुकाने फोडली आहेत.
दुकानातून चोरट्यांच्या हाती फारसे काही लागले नसले तरी या सर्व घटनांमुळे रत्नागिरीत खळबळ उडाली आहे.
आज सकाळच्या सुमारास आपले दुकान उघडण्यास आल्यावर दुकानदारांच्या हि गोष्ट निदर्शनास आली आहे. याबाबतची खबर पोलिसांना दिल्यावर पोलीस घटनास्थळी हजर झाले आहेत. धमालानीचा पार येथील अनिरुद्ध ट्रेडर्स, धनजी नाका येथील नागरवाला जनरल स्टोअर्स, आठवडा बाजार येथी यश ट्रेडर्स आणि यश डीस्ट्रीब्यूटर या दुकानात चोरीच्या घटना घडल्या आहेत.