रत्नागिरी:- स्वप्नाली सावंत खून प्रकरणातील तिघांना आज सोमवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी आणखी तपासासाठी पोलिस कोठडी वाढवून देण्याची मागणी कोर्टासमोर केली. कोर्टाने तिन्ही संशयितांना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. म्हणजे 21 सप्टेंबरपर्यंत त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
स्वप्नाली सावंत यांचा पती सुकांत सावंत, रुपेश सावंत, प्रमोद रावणग याना 11 सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यावेळी न्यायालयाने 19 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. आज सोमवारी ही कोठडी संपल्याने तिघांना पुन्हा कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी आणखी पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली. कोर्टाने 2 दिवसांची मुदत वाढवून देत बुधवार 21 सप्टेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.









