रत्नागिरी:- शेजार्याने हाकललेल्या वानरांमुळे घराच्या छपराचे नुकसान झाले. याबाबत जाब विचारल्याच्या रागातून महिलेला आणि तिच्या मुलाला शिवीगाळ करत बंदुकीचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवार २० ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.३० वा.चाफे बौध्दवाडी येथे घडली.
संतोष तुकाराम जाधव आणि प्रतिज्ञा संतोष जाधव (दोन्ही रा.चाफे बौध्दवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दांपत्याचे नाव आहे.
त्यांच्या विरोधात संगिता वसंत जाधव (६५,रा.चाफे बौध्दवाडी,रत्नागिरी) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार,शनिवारी सायंकाळी घराजवळ आलेली वानरे प्रतिज्ञा जाधव हिने हाकलली. ती संगिता जाधव यांच्या घरावर गेल्याने त्यांच्या घराची कौले व पत्र्यांचे नुकसान झाले.याबाबत त्यांनी जाब विचारल्याच्या रागातून संतोषने संगिता जाधव आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ केली.तसेच बंदुक आणून तिचा धाक दाखवत ठार मारण्याची धमकि दिली.अधिक तपास जयगड पोलिस करत आहेत.