खेड:- खेड तालुक्यातील शिंगरी, किंजळेतर्फे नातू या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये 28 लाख 7 हजार 373 रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी ग्रामसेवक पोपट कुसुम भोरजे याला पोलीस कोठडी देण्यात आली होती. मात्र काल गुरुवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याबाबतची फिर्याद दिली होती ग्रामविस्तार अधिकारी शरद भांड यांनी.
2015 ते 2017 या कालावधीत 28 लाख 7 हजार 373 रुपयांच्या शासकीय निधीचा वापर गावाच्या विकासासाठी न करता स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचे निष्पन्न झाले होते. ग्रामविस्तार अधिकारी शरद भांड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 जुलै रोजी ग्रामसेवक पोपट भोरजे याला अटक करुन 20 जुलैला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने 21 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.