चिपळूण:- कोचिवली – लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्स्प्रेस या रेल्वेगाडीतून गोवा ते चिपळूण असा प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचे दोन मोबाईल व रोख रक्कम असा २५ हजार ४९८ रुयये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरला. ही घटना दि. १६ ते १७ जूनदरम्यान घडली असून याप्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत नंदलाल शंकर चौहाण (२३, उत्तरप्रदेश) याने दिलेल्या फिर्यादीनुसार तो दि. १६ जून राजी सायंकाळी ५.४० ते दि. १७ रोजी मध्यरात्री २.३० वाजण्याच्या सुमारास गोवा ते चिपळूण असा कोचिवली-लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्स्प्रेस या रेल्वेगाडीतून बोगी नं. डी १, आसन नं. ५ या डब्यातून सीटवर झोपून प्रवास करत होता. यावेळी त्याच्या पॅन्टच्या उजव्या खिशात ठेवलेला १२ हजार ९९९ रुपये व ११ हजार ९९९ रुपये किंमतीचे दोन मोबाईल व रोख रक्कम पाचशे रुपये असा २५ हजार ४९८ रुपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरुन नेला. हा प्रकार नंदलाल याच्या लक्षात आल्यानंतर त्याने याबाबत चिपळूण पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.