रत्नागिरी:- शहरातील प्रमोद महाजन क्रीडांगणावर सुरु असलेल्या रत्न कृषी महोत्सव व पशुपक्षी प्रदर्शनात राज्य, जिल्हास्तरावर पुरस्कार विजेत्या शेतकर्यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी सुनंदा कुर्हाडे, रोहन बने, राजू महाडिक आदी. कृषि पुरस्कार प्राप्त शेतकरी हरिश्चंद्र धोंडू शिगवण (कुंभवे, ता. दापोली), मिलिंद दिनकर वैद्य (रीळ, ता. रत्नागिरी), शेखर शिवाजीराव विचारे (वरवेली, ता. गुहागर) यांचा मान्यंवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच खरीप हंगाम भात पिक स्पर्धा २०२१-२२ जिल्हयातील उच्च उत्पादन घेणारे शेतकरी शांताराम सादू खापरे (शेडवई ता.मंडणगड), विलास कृष्णा किंजळे (वाटद, ता. रत्नागिरी), वसंत सोनू घरवे (निगडे, ता. दापोली), आत्माराम भिकाजी गोनबरे (भगवतीनगर, ता. रत्नागिरी), चंद्रकांत हरिचंद्र जान्स्कर (कोतापूर, ता. राजापूर), सुर्यकांत बाळू दाभिळकर (चिंचाळी, ता. दापोली) यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
रत्नकृषी महोत्सवात शनिवारी (ता. २०) सकाळी ११ ते १२.३० वा. या वेळेत कृषी पणन मंडळाकरिता संधी या विषयावर सहाय्यक सरव्यवस्थापक मिलींद जोशी शेतकर्यांना माहिती देणार आहेत. त्यानंतर ३ ते ५ वा. यावेळेत मत्सप्रक्रिया व मुस्यवर्धन याबाबत मत्स्य महाविद्यालय शिरगाव तर्फे माहिती देण्यात येणार आहे. सांयकाळी ७ ते १० या वेळेत महाराष्ट्र व कोकणातील लोककला याबाबत सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. रविवार २१ मे रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत जिल्हा संसाधन व्यक्ती शेखर विचारे आणि अग्रणी बँक व्यवस्थापक एन.डी. पाटील हे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजना या बाबत मार्गदर्शन करणार आहेत.