रामआळीतील कॉर्नर स्टाईल कपड्यांचे दुकान फोडून 3 लाख 19 हजारांचा ऐवज लंपास

रत्नागिरी:-शहरातील रामआळी येथे कापड्याचे दुकान फोडून 3 लाख 19 हजार 699 रुपयांची चोरी झाल्याची घटना 15 मे रोजी उघडकीस आली. याबाबतची फिर्याद कमलेश गुंदेजा यांनी शहर पोलीस स्थानकात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामआळी येथे गुंदेचा यांचे कॉर्नर स्टाईल कापडाचे दुकान आहे. या दुकानात अज्ञात चोरटयानी टेरेसवरुन येवून लोखंडी ग्रील उचकटून दुकानात प्रवेश केला. दुकानातील 24 हजारांची रोख रक्कम, 1 लाख 23 हजार 938 रुपयांचे 60 शर्टस, 56 हजार 470 रुपयांच्या 30 जीन्स, 48 हजार 975 रुपयांच्या ट्राउझर, 40 हजार 776 रुपयांच्या टी शर्ट, 20 हजार रुपयांच्या ब्लेझर जॅकेट, 42 हजार रुपयांच्या सिल्वर कॉईन, 840 रुपयांची चांदीची दोन नाणी असा एकूण 3 लाख 19 हजार 699 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला.

कमलेश गुंदेचा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञातावर भादविकलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.