रत्नागिरी:-रत्नागिरी शहरातील नाचणे येथून इलेक्ट्रीक दुचाकीची बॅटरी चोरीप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ मार्चला रात्री साडेअकरा ते मध्यरात्री एकच्या सुमारास घडली आहे.
नंदकुमार जगन्नाथ पेटकर (५७, रा. नुतननगर, नाचणे रत्नागिरी) २७ मार्चला औरा नावाची इलेक्ट्रीक दुचाकी बॅटरी घराच्या जिन्याखाली चार्जिंगसाठी लावली होती. दुसर्या दिवशी सकाळी ते दुचाकी व बॅटरी पूर्ण चार्ज झाली का ते पाहण्यासाठी गेले असता दुचाकीची बॅटरी व चार्जर चोरीस गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी गुरूवार दि. २१ रोजी पेटकर यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.