चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील मुंढे विकासवाडी येथे घर फोडून दागिन्यांसह 2 लाख 64 हजार 111 रुपयांची चोरी झाल्याची घटना शुक्रवार 8 एप्रिल रोजी घडली. याबाबतची फिर्याद राधा राजेश घाग (42, मुंढे विकासवाडी, चिपळूण) यांनी येथील पोलीस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधा घाग या घरी नसताना बंद घराचे कुलूप तोडून अज्ञाताने देवघराच्या खोलीत ठेवलेल्या कपाटातील 2 लाख 32 हजार 111 रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख 32 हजार रुपयांची रक्कम असा एकूण 2 लाख 64 हजार 111 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. यामध्ये सोन्याचे मंगळसूत्र, हार,कर्णफुले, चेन, अंगठी, सोन्याची माळ असा ऐवज गेल्याचे घाग यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक साळोखे अधिक तपास करत आहेत.