चिपळूणात घर फोडून एक लाखांचे दागिने लंपास

रत्नागिरी:-गावाला गेलेल्या व्यक्तीचे बंद घर फोडून सोन्याच्या दागिन्यांसह 1 लाख 3 हजार 651 रुपयांची चोरी झाल्याची घटना चिपळूणमधील प्रथमेश अपार्टमेंट, शिवाजीनगर येथे घडली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय साहेबराव कदम (55, प्रथमेश अपार्टमेंट शिवाजीनगर, चिपळूण) हे आपल्या मूळगावी सातारा हे 31 मार्च ते 4 एप्रिल दरम्याने गेले होते. याचदरम्यान कदम यांच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून अज्ञाताने बेडरुममधील दागिन्यांची चोरी केली. यामध्ये 70 हजार 314 रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र, 4685 रुपयांचे 6 ग्रॅम वजनाचे कानातील टॉप, 9 हजार रुपयांचे 2 ग्रॅम वजनाचे कानातील टॉप, 10 हजार 665 रु. किंमतीची फॅन्सी पॉवल पेंडन्ट, 8987 रुपये किंमतीची सोन्याची अंगठी असा एकूण 1 लाख 3 हजार 651 रुपयांच्या मुद्देमाल चोरीस गेला.

याबाबतची फिर्याद विजय कदम यांनी चिपळूण पोलीस स्थानकान दाखल केली. पोलिसांनी अज्ञाताविरोधात भादविकलम 454, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे.