रत्नागिरी:-शहरानजीकच्या गयाळवाडी-खेडशी येथील बंद घराची कडी-कोयंडी तोडून अज्ञाताने सोन्याचे दागिने,रोख रक्कम असा एकूण ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लांबवला.ही घटना शुक्रवार १ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६.३० वा.कालावधीत घडली आहे.
याबाबत मयुर मनोहर दरेकर (३१,रा.गयाळवाडी खेडशी,रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.त्यानूसार,शुक्रवार १ एप्रिल रोजी सकाळी ते आपल्या घराचे सर्व दरवाजे बंद करुन व मुख्य दरवाजाला कुलुप लावून नोकरीवर गेले होते.सायंकाळी ६.३० वा.सुमारास दरेकर घरी परतले असता त्यांना दरवाजाच्या कोयंडा उचकटलेला दिसून आला.त्यांनी घरात जाउन पाहिले असता त्यांना बेडरुममधील भिंतीमधील कपाटातील चावी घेउन लोखंडी व लाकडी कपाटातील लॉकर फोडून अज्ञाताने चोरी केल्याचे लक्षात आले.यात सोन्याची नथ,अंगठी,सोन्याचे आणि चांदीचे कॉईन आणि रोख 4 हजार रुपये असा एकूण ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे.याप्रकरणी अधिक तपास पोलिस हवालदार कांबळे करत आहे









