खेड:-खेड तालुक्यातील खोपी रोहिदासवाडी येथे वडिलोपार्जित जमिनीतून पुतण्याने काकावर हल्ला केला. काकाच्या डोक्यात बांबूने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप भाऊ खोपकर (55, खेड) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलेश शांताराम खोपकर (38, खोपी, रोहिदासवाडी) हा वडिलोपार्जित जमिनीत कामगारामार्फत कंपाउंडचे काम करत होता. या कामाला संदीप खोपकर यांनी हरकत घेतली. या गोष्टीचा राग मनात धरून शैलेश याने काका संदीप खोपकर यांना शिवीगाळ करून डोक्यात बांबूने मारहाण केलेली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची फिर्याद संदीप खोपकर यांनी येथील पोलीस स्थानकात दाखल केल्यानंतर शैलेश याच्याविरोधात भादवि कलम 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









