दापोली हर्णे येथे 1 लाख 92 हजारांचा गुटखा जप्त 

दापोली:- दापोली तालुक्यातील हर्णै येथे एक लाख 92 हजार रूपयाचा गुटखा दापोली येथील रत्नागिरी गुन्हे अन्वेषण विभाग पोलीसांनी जप्त केला. याधीही अशी कारवाई करण्यात आली होती. त्यावेळेस याच परिसरातील दोन अन्य जणांना अटक करण्यात आली होती तर दापोली बाजारपेठ येथील एका व्यापाऱ्याला खेड भरणे येथे अटक करण्यात आली होती.या अवैध गुटखा विक्री व्यवसायाचे दापोली कनेक्शन पुन्हा एकदा समोर आले आहे.

अफ़जब अलताफ हुसेन मेमन (३६ नवानगर वरचा मोहल्ला),जरीफ मुस्तकीन अकबाणी (१९ हर्णै बाजारपेठ) या दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली होती.

दापोली पोलीस स्थानकाकडून मिळालेल्या माहितीनुसार विमल पानमसाला तंबाखू 1000 पॅकेट्स हर्णै बाजारपेठ येथील चिकन सेंटरचे पुढील बाजूस रस्त्यालगत असलेल्या जरीफ मुस्तकीन अकबाणी याने त्याचे घरा शेजारील पार्किंगशेडच्या पाठीमागील बाजूस एक लाख 92 हजार रूपयांचा प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य (गुटखा) बेकायदेशीर माल विक्रीकरिता साठा करून ठेवला होता. दापोली पोलीसानी केलेल्या कारवाईत सदर माल जप्त करण्यात येऊन आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत भादवि 272,273 आणि 32B नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोउनि कांबळे करित आहेत.