रत्नागिरी:- एसटी विलीनीकरण विषय मार्गी लावण्यासाठी कायमस्वरूपी लढा द्यायचा आहे. मात्र, पगारवाढ हजर होऊ आणि लढाही सुरू ठेवू या, असे आवाहन काही संघटनांनी केले होते. मात्र, याची दखल कोणत्याही कर्मचार्यानी घेतली नाही. सोमवारी संध्याकाळपर्यंत 103 एसटी कर्मचार्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
दि. 20 जानेवारी नंतर किंवा 8 फेब्रुवारीपर्यंत संपाबाबत योग्य निर्णय होईल, असे कृती समितीचे म्हणणे होते. गेल्या 75 ते 80 दिवसापासून संप मागे घेण्यासंदर्भात विविध आश्वासने कर्मचारी यांच्याकडून प्रशासनाला मिळाली आहेत मात्र, संप अद्यापही मागे घेण्यात आलेला नाही. त्यामुळे आता जरी 8 फेब्रुवारीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असली तरी या बाबत प्रशासनही आता आशेवर नाही. मात्र, महामंडळ कडून टप्याटप्याने कंत्राटी कामगार घेतले जाणार असल्याचे या पूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. सुरुवातीला 400 कंत्राटी चालक वाहक घेण्यात येणार आहे. असे असले तरी अद्याप ही बाब कर्मचार्यांनिीगांभीर्याने घेतली नाही, संघटना पदाधिकारी यांचेही ऐकत नसल्याची बाब समोर आली आहे.
दरम्यान, सुरुवातीला ज्या पद्धतीने सर्व संघटना एकत्र येऊन हा लढा देत होते, त्या पद्धतीने आताही लढा सुरू आहे. मात्र कर्मचारी याला प्रतिसाद देत नाहीत. विलीनीकरण झाल्याशिवाय कामावर हजर न होण्याचा पवित्रा कर्मचारी वर्गानी घेतला आहे तर पगारवाढ घेऊन कामावर हजर होऊ या आणि विलीनीकरणाची मागणी लावून धरू या, असे संघटना पदाधिकार्यांचे म्हणणे आहे. मात्र, हजर होण्याबाबत अद्यापही कर्मचार्यांमध्ये उदासीनता आहे.









