रत्नागिरी:- शासनाने घालून दिलेल्या वेळेनंतर माळनाका येथील डायमंड बार ॲण्ड रेस्टॉरंट हे रात्री १० नंतर चालू ठेवल्याप्रकरणी बारमालकावर शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई १४ जानेवारी रोजी रात्री ११ वाजता करण्यात आली. दिनेश विनायक शानबाग ( ४८, रा. माळनाका ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक गणेश सावंत यांनी शहर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. दिनेश याने शासनाने रात्री १० नंतर बंदी असतानाही डायमंड बार सुरु ठेवला होता. अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रवीण वीर करीत आहेत.