चिपळूण-शिरगावमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस; वाशिष्टी नदीला पूर

कुंभार्ली घाटात दरड कोसळली
 

चिपळूण:- शिरगाव व पोफळी परिसरात ढगफुटी होऊन शिरगावच्या वाशिष्टी नदीला पूर आला. कुंभार्ली घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. मात्र दरड तात्काळ जेसीबीच्या साहयाने दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली.

शिरगाव पोफळी परिसरात रविवारी सायंकाळी 5 .30 च्या दरम्यान जोरदार पावसाने बॅटींग करण्यास सुरुवात केली. घाटातील डोंगर दऱ्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे शिरगावच्या वाशिष्टी नदीला काही क्षणात पूरपरिस्थिती निर्माण झाली. तर कुंभार्ली घाटातील एका वळणावर दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे घाटातील काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती. शिरगावच्या वाशिष्टी नदीने रूद्र रूप धारण केले. त्यामुळे पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली. तात्काळ शिरगाव पोलीस यांनी दखल घेत शिरगावच्या वाशिष्टी पुलावरील वाहतूक बंद केली
 कुंभार्ली घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. मात्र पोलीस व ग्रामस्थांनी जेसीबीच्या साहयाने दरड बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली होती.