रत्नागिरी:- तीन महिन्यांपूर्वी तालुक्यातील चाफे तिठा येथील चिरे खाणीवरील स्टोअर फोडून सुमारे 70 हजार रुपयांचे सामान लांबवणार्या चोरट्यांचा मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. तीन संशयितांपैकी एकाला यापूर्वीच अटक करण्यात आली होती. बुधवारी त्याच्या दोन साथिदारांना आणि ते सामान विकत घेणार्यालाही अटक करण्यात आली आहे.
संशयितांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांची रवानगी 2 ऑक्टोबर पर्यंत पोलिस कोठडीत करण्यात आली आहे.राजू उर्फ सागर गुलाब पवार (26) याला पूर्वीच अटक करण्यात आलेली असून तो पोलिस कोठडीत आहे.तर सारुफ सैफुखान (27),महम्मद बाबुल्लाह हुसैन (47,दोन्ही मुळ रा.उत्तरप्रदेश सध्या रा.रिंगीवाडी चाफेरी) आणि त्यांच्याकडील चोरीचे सामान विकत घेणारा मासूम सिध्दिकखान (30,मुळ रा.उत्तरप्रदेश सध्या रा.वाटद फाटा,रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.याबाबत चिरेखाण मालक विद्याधर शांताराम तांदळे (26,रा.मालगुंड,रत्नागिरी) यांनी जयगड पोलिसांकडे तक्रार दिली होती.त्यानूसार,26 जून ते 17 जुलै 2021 या कालावधीत त्यांच्या चाफे तिठा येथील चिरे खाणीवरील स्टोअर फोडून अज्ञातांनी तीन इलेट्रिक मोटार आणि एक कटिंग ब्लेड असे एकूण 70 हजार रुपयांचे सामान चोरुन नेले होते.याप्रकरणी तपास करताना जयगड पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीतील एक कटिंग ब्लेडही जप्त केले आहे.









