घरातील दागिन्यांची चोरी, दोघांवर संशय

रत्नागिरी:- आईने घरच्या कपाटात ठेवलेले सुमारे ४१ हजाराचे दागिने तिच्या निधनानंतर चोरीला गेल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. घर कामाला असलेल्या दोघांवर तक्रारदाराने संशय व्यक्त केला आहे. शहरातील कोकण नगर येथे २९ ऑगस्टला ही घटना घडली आहे. शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अल्तमश अय्युब झारी (वय ३५, रा. साईचौक कोकणनगर) यांनी ही तक्रार दिली आहे. त्यांची आई शहजादी अय्युब झाली या आजारी असतात. त्यांच्या अंगावरील  २ तोळ्याची सोनाच्या चैन, अर्धा तोळ्याची कानातील रिंग आणि हजार रुपयाची नाकातील चमकी असे दागिने घरातील लोखंडी कपाटामध्ये ठेवल्याचे तिने मला सांगितले होते. मात्र आईच्या निधनानंतर ते दागिने लोखंडी कपाटात पाहण्यासाठी गेलो असता ते मिळून आले नाहीत. त्यामुळे हे दागिने घरात कामाला ठेवलेल्या प्रज्ञा गोरे आणि शुभम करंडे (रा. थिबापॅलेस) यांनी चोरून नेल्याचा संशय असल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलिस फौजदार श्री. पाटील करीत आहेत.