जिल्ह्यात नव्याने 104 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तर 5 मृत्यूची नोंद 

रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने 104 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत तर 5 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नव्या 104 पॉझिटिव्ह रुग्णांमुळे रुग्णसंख्या 75 हजार 143  इतकी झाली आहे. 

जिल्ह्यात 24 तासात 364 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यँत 71 हजार 741 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 95. 48 टक्के आहे. 

 नव्याने 5 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृृृत 5 पैकी 24 तासातील 2 तर त्यापूर्वीचे 3 असे 5 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 263 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.01 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 656 तर संस्थात्मक विलीकरणात 495 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात लक्षण नसलेले 778 तर लक्षण असलेले 282 असे एकूण 1 हजार 60 रुग्ण उपचार घेत आहेत. 

 मागील 24 तासात 2 हजार 792 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आता पर्यंत 6 लाख 36 हजार 382 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.