जिल्ह्यात 24 तासात 159 कोरोना पॉझिटिव्ह

रत्नागिरी:-जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण घटले आहे. मागील 24 तासात 159 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून आतापर्यंत 69 हजार 554 रुग्ण सापडले आहेत. जिल्ह्यात सध्या 2658 कोरोनाबाधित उपचार घेत आहेत.

नव्याने 159 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात आतापर्यंत 69 हजार 554 रुग्ण सापडले आहेत.  24 तासात 236 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. आतापर्यंत 64 हजार 930 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोना बाधित मृतांचा आकडा 1 हजार 966 इतका आहे.