अंजनवेल येथे तरुणाचा बुडून मृत्यू

गुहागर:- तालुक्यातील आरेगांव येथील केतन भोसले या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. केतन रविवारी दुपारी अंजनवेल परिसरात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला होता.

अंजनवेल गावात कातळवाडी ते पेठ अंजनवेल असा अंतर्गत रस्त्या आहे. त्याठिकाणी नदीच्या बाजूला असलेल्या बंधार्‍यामध्ये पावसाळ्यात गुहागर तालुक्यातील कॉलेज विद्यार्थी, पुरुष, महिला येथे पोहोण्याचा आनंद लुटण्यासाठी येतात. रविवार असल्याने या रस्त्यावरील अनेक बंधाऱ्यांवर पोहोण्यासाठी गर्दी झाली होती. केतन भोसलेही आपल्या मित्रांसोबत पोहताना अचानक केतन दिसेनासा झाला. केतनच्या मित्रांनी बाजारपेठत पुलापर्यंत केतनचा शोध घेतला. त्यानंतर आरेगावातील ग्रामस्थांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेण्यास सुरुवात केली. सायंकाळी केतनचा मृतदेह याच नदीत सापडला.