देवरुखमध्ये पिस्तूलाचा धाक दाखवत दरोडा; पाच लाखांचा ऐवज लंपास

रत्नागिरी:- देवरूख कांजिवरा येथे अज्ञात चोरट्यांनी पिस्तुल व चाकुचा धाक दाखवत सोन्याचे चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण ५ लाख ३८ हजार १०० रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना शुक्रवारी ९ जुलै रोजी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.  याप्रकरणी अज्ञात ४ चोरट्यांवर देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

  देवरूख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार याबाबत देवरूख कांजिवरा येथील नुरूल होदा मशहुरअली सिद्दीकी यांनी फीर्याद दिली आहे. गुरूवारी रा ाी सिद्दीकी कुटुंबिय जेवण करून झोपी गेले. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या मागील दरवाज्याची कडी लोखंडी हत्याराने उचकटून दरवाजा उघडून बंगल्यामध्ये प्रवेश केला. दरवाजा उघडल्याचा आवाज येताच नुरूल सिध्दीकी हे खडबडून जागे झाले. सिध्दीकी हे समोर येताच अज्ञात चोरट्यांनी त्यांना लाथाबुक्याने मारहाण केली.
   

सिध्दीकी यांच्या पत्नी त्यांना सोडविण्यासाठी आल्या असता, पिस्तुल व चाकुचा धाक दाखवला. यानंतर जबरदस्तीने बेडरूमधील कपाटे स्क्रु ड्रायव्हरने उघडून आतील कपडे व अन्य साहित्य अस्थाव्यस्थ फेकून सोन्या चांदीचे दागिने, रोख रक्कम असा एकूण ५ लाख ३८ हजार १०० रूपयांचा ऐवज व मोबाईल हँन्डसेट चोरट्यांनी लंपास केल्याचे फीर्यादीत नमूद करण्यात आले आहे.