रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत चालला आहे. रत्नागिरीत जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक लहान मुलांना विळखा घातल्याचे पाहायला येत आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याआधी रत्नागिरी जिल्ह्यात लहान मुले कोरोनाच्या विळख्यात सापडलेली पाहायला मिळत आहे.
जून महिन्यात तब्बल 1176 बालके कोरोनाबाधित सापडली आहेत. रत्नागिरीत कोरोनाचा विळखा बसलेली बालके 14 वर्षाच्या आधी वयोगटाची आहेत. तर रत्नागिरी जिल्ह्यात बालके बाधित होण्याचं प्रमाण 6.44 टक्के एवढं आहे.
रत्नागिरीत दर दिवशी 400 ते 500 कोरोना रुग्ण आढळत आहे. सद्यस्थितीत 6102 ॲक्टिव्ह रुग्ण असून पॉझिटिव्हीटी रेट हा 7.87 टक्के आहे. तर मृत्यूदर हा 2.86 टक्के असून रिकव्हरी रेट हा 87.97 टक्के आहे.
दरम्यान, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक ठरण्याची भीती वर्तवली जात आहे. मात्र त्यापूर्वी रत्नागिरी जिल्ह्यात लहान मुलांना कोरोनाचा विळखा बसू लागला आहे.









