रत्नागिरी:- शहरातील मांडवी समुद्रकिनारी या सार्वजनिक ठिकाणी कोरोना काळात स्वतःच्या तोंडाला मास्क न लावल्याप्रकरणी एका विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार 17 जून रोजी सायंकाळी 6.30 वा.सुमारास करण्यात आली.
वैभव अभिजित नागवेकर (रा. हातीस,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस शिपाई करण देसाई यांनी तक्रार दिली आहे.त्यानूसार, कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याचा संभव असल्याचे माहित असतानाही त्याने सार्वजनिक ठिकाणी आपल्या तोंडाला मास्क न लावता हयगईचे कृत्य केले. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.