रत्नागिरी:- डेहराडून कोच्चीवेली एक्स्प्रेसने प्रवास करणार्या प्रवाशाकडील 79 हजार रुपयांचा ऐवज धावत्या ट्रेनमधून अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याप्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुणालकुमार संजीव शर्मा (वय 23, रा. बिहार, सध्या रा. रेल्वेस्टेशन शेजारी) हा तरुण 15 जून रोजी डेहराडून कोच्चीवेली एक्स्प्रेसने सुरत ते रत्नागिरी असा प्रवास करत असताना रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या अलिकडे गाडी आली असता शर्मा हा ट्रेनमधील टॉयलेटमध्ये गेला असता त्याचा फायदा उचलून अज्ञात चोरट्याने धावत्या ट्रेनमधून शर्मा याच्याकडील 79 हजार रुपयांचा ऐवज हातोहात चोरून नेला.
यामध्ये 40 हजार रुपये किंततीचा लॅपटॉप, 9 हजार रुपये किमतीचा मोबाईल व 30 हजार रुपयाची रोख रक्कम असा ऐवज चोरट्याने लांबविला. याप्रकरणी कुणालकुमार शर्मा यांनी ग्रामीण पोलीस स्थानकात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात भा.दं.वि. क. 379 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.