बविआ आक्रमक; प्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशारा
रत्नागिरी:- आता तर पावसाला सुरूवात झाल्याने खरीपात शेतीची कामे पारंभ झालेला आहे. शेतकऱ्यांनी कर्ज काढून पॉवर ट्रिलर सारखी अवजारे खरेदी केलेली आहेत. परंतु त्या अवजारांसाठी लागणारे इंधन पेट्रोलपंपात देणे प्रशासनाने बंद केलेले आहे. पंपात पोलीस कर्मचारी ठेवून कुठल्याही शेतकऱ्याला पेट्रोल मिळणार नाही याची व्यवस्था केल्याचे बविआचे जिल्हाप्रमुख व एक शेतकरी तानाजी कुळये यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
एक प्रकारे शेतकऱ्यांनी जगावं की मरावं अशा अवस्थेत पशासनाने शेतकऱ्यांवर हुकूमशाही सुरू केलेली असल्याचे सांगितले. जिल्ह्यातील पशासन आणि त्यांना नाचवणारे लोकप्रतिनिधी यांना येथील नागरिकांच्या उभ्या ठाकणाऱ्या समस्यांचे कोणतेही सोयरेसुतक नसल्यासारखे वागत आहेत. व्यापारी वर्गाशी चर्चा करून लॉकडावून लावला जातो, पण येथील सामान्य शेतकऱ्यांशी कधी चर्चा करणार? असा सवाल तानाजी कुळ्ये यंनी केला आहे. शेती हंगामासाठी नियोजन करणे आवश्यक असताना पशासन अपयशी ठरले आहे. गेले दोन महिने सर्वसामान्य माणसांबरोबरच येथील शेतकरी, कष्टकरी लॉकडावून काळात घरी आहेत. हाताला काम नाही, त्यामुळे पैसा नाही, पैसा नाही म्हणून किराणा नाही. अशा परिस्थितीत नैराशेच्या गर्तेत अडकलेला आहे. अनेक सामान्य कुटुंबे उध्वस्त होण्याच्या स्थितीत आहेत.
पोलिसांनीही शेतकऱ्यांशी सौजन्याने वागावे, शेतीसाठी लागणारे बियाणे, पॉवर ट्रिलर, खते, इंधन आदी कृषी विषयक खरेदीसाठी ये-जा करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांची जर अशापकारे अडवणूक होत असेल तर त्यांना शेतीसाठी लागणारे पेट्रोल-डिझेल जिल्हा पशासनाने उपलब्ध करावे. त्यासाठी पास आवश्यक असेल तर तहसिलदार यांनी गावातील तलाठी, ग्रामसेवक यांच्यामार्फत उपलब्ध करुन द्यावेत किंवा त्यांना अधिकार द्यावेत. अन्यथा जिल्ह्यातील शेतकरी शेतीबंद आंदोलन करतील असा इशारा बविआ जिल्हापमुख तानाजी कुळ्ये यांनी दिला आहे.