खेडः– कोकणात येण्यासाठी ऑफिस ऑफ कमिशनर ऑफ मुंबई सीटी महाराष्ट्र या नावाचा आणि लोगोचा गैरवापर करत बनावट ई-पास बनवून प्रवाशांची फसवणूक करणारे मनोज दुधवडकर व विक्रांत सोनवणे यांच्याविरुद्ध खेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
वाहनचालक दिनेश कार्लेकर (रा.ज़ोगेश्वरी) यांच्या शेजारी राहणारा मनोज दुधवडकर हा बनावट ई-पास बनवून दिला आहे. त्यांनी चालक दिनेश कार्लेकर यांच्या नावाचा पास खरा आहे असे भासवत बनावट पास तयार करण्यास मदत केली. मनोज दुधवडकर आणि विक्रांत सोनावणे याने बनावट पास तयार करुन दिला. त्यामुळे या दोन्ही आरोपींनी स्वतःच्या फायद्याकरीता संघटीतरित्या काम करुन ऑफिस ऑफ कमिशनर ऑफ मुंबई सीटी महाराष्ट्र या नावाचा आणि लोगोचा गैरवापर करुन प्रवाशांची फसवणूक केली. तसेच हा पास हॉस्पिटलमधील उपचारासाठी हवा असल्याचे खोटे कारण दिले. त्यामुळे खेड पोलीस ठाण्यात या दोघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.









