रत्नागिरी:- राज्य शासनाने लग्न समारंभासाठी 2 तासांची मुदत दिलेली असताना देखील 2 तासात विवाह सोहळा न आटोपल्याने प्रशासनाने 50 हजारांचा दंड ठोठावला. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात सडेजांभारी या गावात काल (बुधवारी) ही घटना घडली.
कोरोनाच्या वाढत्या संकटाला आळा घालण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यात लग्न समारंभाकरिता 2 तास आणि 25 माणसं उपस्थित राहण्याची मुभा आहे. मात्र या आदेशाचे उल्लंघन झाल्याने गुहागर तालुक्यात 50 हजारांचा दंड बसला आहे.
गुहागर तालुक्यातील सडेजांभारी गावातील सूरज पांडुरंग घेवडे यांना शीर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांनी नियमानुसार 50 हजारांचा दंड केला आहे. यामुळे हा लग्न सोहळा यजमानांना चांगलाच महागात पडल्याची चर्चा आहे.









