73 नवे पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या तीन हजार पार   

रत्नागिरी:- नव्याने प्राप्त अहवालानुसार जिल्हयात ॲन्टीजेन चाचणीत 64  तर आरटीपीसीआर चाचणीत 9 असे एकूण 73  रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्हयातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3018 इतकी झाली. 
 

नव्याने आलेल्या अहवालांमध्ये आरटीपीसीआर मधील रत्नागिरी तालुक्यात 9 तर ॲन्टीजेन  टेस्ट मधील रत्नागिरीतील 28, दापोली 22, संगमेश्वर 1, घरडा रुग्णालय 13 असे एकूण 9 + 64 असे 73 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.     

मंगळवारी बस स्थानकाशेजारी, रत्नागिरी येथील 40 वर्षीय कोरोना रुग्णाचा तसेच  काजुरी, ता. गुहागर येथील 42 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यु झाला. त्यामुळे एकूण मृत्यु संख्या आता  107 झाली आहे.